दलित समाजाला ग्राह्य धरु नका, आठवलेंचा भाजपा- सेनेला इशारा

Foto

 देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यांनी आमचा आदर करावा आणि मगच आमच्याकडून आदराची अपेक्षा करावी, असे त्यांनी शिवसेना- भाजपाला सुनावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा - शिवसेना युती झाली असली युतीतील आणखी एक मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सत्ताधार्‍यांना इशाराच दिला आहे. शिवसेना - भाजपा युतीने दलित मतांना ग्राह्य धरु नये, असा शब्दात आठवले यांनी युतीवर नाराजी व्यक्त केली आहे.राज्यात शिवसेना- भाजपा युती झाली असून आगामी लोकसभा निवडणूक भाजपा 25 तर शिवसेना 23 जागा लढणार आहेत. जागावाटपावरुन आता रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker